💥केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटकडून आणखी 10 कोटी लस खरेदी करणार....!


💥सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII ) कडे एक नवीन खरेदीचा आदेश दिला आहे💥

नवी दिल्ली, दि. 17 : ऑक्सफोर्ड-अस्त्राझेनेका कोविड लस  कोविशिल्डच्या आणखी 10 कोटी डोसच्या पुरवठ्यासाठी सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII ) कडे एक नवीन खरेदीचा आदेश दिला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

एचएसएल लाइफकेयर लिमिटेड या पीएसयूने 12 मार्च रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने पुणे-SII येथे शासकीय व नियामक कामकाज संचालक प्रकाश कुमार सिंह यांच्या नावे पुरवठा आदेश जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने 10 कोटी डोसच्या  खर्च अर्थसंकल्पित तरतूदीसाठी केला आहे. कोविड लसींच्या आधीच्या ऑर्डरचा खर्च पंतप्रधान केअर्स फंडने केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारताने  SII द्वारे निर्मित कोविशिल्ड आणि हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या स्वदेशी विकसित कोवॅक्सिन या दोन लसींना प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता दिली आहे.लसीकरणात  देशाने 3.50 कोटींचा टप्पा ओलांडला ; महाराष्ट्रात 33 लाखांहून अधिक लोकांना लस

कोविड -19 विरोधात  आत्तापर्यंत भारताने लसीकरणात 3.50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे . काल, देशात एका दिवसात 21 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. केवळ 17 दिवसात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1 कोटीहून अधिक लाभार्थीना  लस देण्यात आली. आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अंतरिम माहितीनुसार आतापर्यंत  3,50,64,536 लसीचे डोस देण्यात आले आहेत.     गेल्या 24 तासांत  17,82,553 (पहिला डोस ) आणि 3,34,551 (दुसरा डोस) देण्यात आले आहेत. दोन्ही डोस  मिळून  देशात गेल्या 24 तासांत  21,17,104  डोस  देण्यात आले आहेत.    

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत  28,62,885 (पहिला डोस ) आणि 4,66,502 (दुसरा डोस) देण्यात आले आहेत. दोन्ही डोस  मिळून  आत्तापर्यंत महाराष्ट्रात 33,29,387 डोस   देण्यात आले आहेत.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या