💥परभणी जिल्ह्यात जीएसटीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद,बाजारपेठातून मोठा शुकशुकाट...!


💥सरकारला जागे करण्याकरिता बंद पुकारला असल्याचे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी नमूद केले💥

परभणी (दि.२६ फेब्रुवारी) : परभणीत जीएसटीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी २०२१रोजी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार आदींनी आपआपले व्यवहार बंद ठेवले. सकाळपासुनच व्यापाऱ्यानी प्रतिष्ठाने उघडलीच नसल्याने बाज़ारपेठेत शुकशुकाट दिसून आला.


शासनाकडून जीएसटी कायद्यात सुमारे ४२ महिन्यात जवळपास एक हजारावर सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक आणि सीए व कर सल्लागार वैतागले आहेत, असे मत जिल्हा व्यापारी महासंघाने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त करित आपला रोष व्यक्त केला.

व्यापारी कर भरावयाला तयार आहेत, पण या सारख्या सुधारणा आणि नोटीसांना ते अक्षरशः कंटाळले आहेत. व्यापार्यांनी जर कर भरला नसता तर हे जीएसटीचे विक्रमी उत्पादन झालेच नसते. कराचे अनेक आणि विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत, असे मतही व्यापारी महांसघाने व्यक्त केले. आम्हाला जीएसटी, गुड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स हवा होता, पण हा तर फारच गुंतागुंंतींचा झाला आहे. तारखांच्या घोळामुळे व्यापारी आणि कर सल्लागार यांना सणवार सुट्टीपण राहीली नाही. सरकारी अधिकारी मात्र पाच दिवसांचा आठवडा आणि सार्वजनिक सुट्ट्या हक्काच्या रजा मिळवून वर्षात चार महिने सुट्ट्या घेवू लागले आहेत. कल्याणकारी राज्य कल्पनेत 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरापराधाला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय घटनेला मान्य आहे. पण, सरकारला मात्र 100 प्रामाणिक करदात्याला शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही कर बुडता, सुटता कामानये हे धोरण राबवायचे आहे. त्यामुळेच सरकारी अधिकारी प्रामाणिक करदात्याच्याच मागे लागले आहेत, असेही व्यापारी महासंघाने म्हटले. प्रामाणिक करदाता कोणताही मोबदला न घेता कर गोळा करतो आहे. पण तोच सर्वात जास्त आज भरडल्या जात आहे. उदाहरणार्थ एकदा जीएसटी भरुन सरकारमान्य डीलरने तो सरकारी तिजोरीत भरला नाही तरी, शिक्षा जीएसटी भरलेल्यांनाच दिली जात आहे. अनेकवेळा इंटरनेट चालू नाही, त्यामुळे बँकेत भरणा करता येत नाही. जीएसटी साईट बंद असते, त्यामुळे रिटर्न अपलोड करता येत नाहीत, पण हे विचारात न घेता प्रामाणिक करदाता शिक्षा आणि दंडास पात्र ठरत असल्याबद्दल व्यापारी महासंघाने तीव्र खंत व्यक्त केली. सरकारी अधिकार्यांना खूप जास्त अधिकार दिल्याने गैरवापराचीही शक्यता वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीला जीएसटी म्हणजे घना सारो टॅक्स न राहता आता तो घना सारो लिटीगेशन टॅक्स झाला आहे. त्यामुळेच सरकारला जागे करण्याकरिता आजचा बंद पुकारला असल्याचे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी नमूद केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या