💥पुर्णेतील अतिक्रमण विरोधी जन आंदोलनास वाल्मिकी आर्मीने दिला जाहिर पाठींबा...!


💥वाल्मिकी आर्मीने निवेदनाव्दारे डॉ.बाबासहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची केली मागणी💥 


पुर्णा (दि.१८ फेब्रुवारी) - शहरातील डॉ.आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ.बाबासहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या मागणीसाठी मागील ५ फेब्रुवारी २०२१ पासून पुर्णा नगर परिषदे समोर सर्वपक्ष तसेच सामाजिक संघटनांसह आंबेडकरवादी जनतेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू असून सदरील आंदोलनाची दखल अद्याप पर्यंत निश्क्रिय नगर परिषद प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही सदरील धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मागणी करीत आज गुरूवार दि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी वाल्मीकि आर्मी महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटने तर्फे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विरोधी जन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनास वाल्मिकी आर्मी महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर वाल्मिकी आर्मीचे परभणी जिल्हाध्यक्ष मनोज कुमार सौदा,अखिल भारतील वाल्मिकी महासभेचे परभणी जिल्हाध्यक्ष विजय कुमार सौदा,कायदे विषयक सल्लागार ॲड.विजेंद्रकुमार वैद्य,सुनिल चिंडालिया,दिपक बुरड,सुनिल गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या