💥औरंगाबादेत रात्रीच्या कर्फ्युच्या पहील्याच दिवशी डॉक्टरांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी पळवला ६० लाखांचा मुद्देमाल....!


💥घरफोडीत चोरट्यांनी 10 लाखांच्या रोख रक्कमेसह 100 तोळे सोन्याचे ऐवज असा एकून ६० लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास💥 

✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद (दि.२४ फेब्रुवारी) : औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी चोरांनी डॉक्टरांचे घर फोडले आहे. तब्बल 100 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये रोख असा सुमारे  60 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

शहरातील प्रताप नगर भागात ही घटना घडली आहे. अक्षय डेंटल या प्रसिद्ध क्लिनीकच्या डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) या परिवारासह देवदर्शनासाठी बाहेर राज्यात गेल्या आहे.  घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला.

आज सकाळी जेव्हा घरातील काम करणारे नोकर साफसफाईसाठी आले. तेव्हा हा सर्व चोरीचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिर्हेसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी हजर झाले होते.....


 ✍️  मोहन चौकेकर
̤̤

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या