💥सिएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खडा सवाल....!


💥भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख राष्ट्रभक्त झाला का ?💥 

मुंबई (दि.२१ फेब्रुवारी) - भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले आहेत. भाजपाने आता या पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे काँग्रेस सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही का, त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का याचे उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाने दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


विलेपार्ले येथे आयोजित गुजराती समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा, गुजराती सेलचे भरत पारेख यांच्यासह गुजराती बांधव उपस्थित होते.

भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा नेहमीच दुसऱ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतो. पण त्यांचेच राष्ट्रप्रेम बेगडी आहे हे रुबल शेख या बांगलादेशी नागरिकाला उत्तर मुंबईचा पदाधिकारी करुन दाखवून दिले आहे. भाजपाचा पदाधिकारी झाल्यानंतर तो बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीएए कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार आहे का? देशात लोकशाही नाही का? याची उत्तरे भाजपाला द्यावी लागतील.  

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. इंधनाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत असे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनीच राज्यसभेत जाहीरपणे कबुल केले आहे. हे सरकार फक्त ‘हम दो हमारे दो’ यांचेच आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या