💥श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे शिवैक्य शिवाचार्य व किर्तनकार श्रद्धांजली अर्पण...!


💥या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी पुष्प अर्पण करुन पुष्पांजली अर्पण केली💥


सोनपेठ (दि.१४ फेब्रुवारी) :- श्री नंदिकेश्वर मठ संस्थान, सोनपेठ येथे रविवार, 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळी व डॉ.मन्मथअप्पा विजयकुमार महाजन आयोजित श्रद्धांजली सभा यामध्ये महाराष्ट्रातील शिवाचार्य शिवैक्य श्रीवसुंधरारत्न श्री.ष.ब्र.108 राष्ट्रसंत डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपूर,शिवैक्य श्री.ष.ब्र.108 बस्वलिंग शिवाचार्य महाराज,पाथरी,शिवैक्य श्री.ष.ब्र.108 बस्वलिंग शिवाचार्य महाराज,हादगाव,शिवैक्य श्री.ष.ब्र.108 सिध्देश्वर शिवाचार्य महाराज,गडगा,शिवैक्य श्री.ष.ब्र.108 बालतपस्वी निर्वाण रुद्रपशुपती शिवाचार्य महाराज,नागठाणा,शिवैक्य शि.भ.प. श्रीमती महादेवीअक्का महाजन,(प्रसिद्ध किर्तनकार,सोनपेठकर) यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्याकरीता श्रद्धांजली सभा आयोजन प्रमुख गुरुवर्य श्री.ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज (संस्थान मठ,सोनपेठ), श्री.ष.ब्र.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज (मठ संस्थान मुखेड), श्री.ष.ब्र.108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज (मठ संस्थान,जिंतूर), श्री.ष.ब्र. 108 काशीनाथ शिवाचार्य महाराज (मठ संस्थान,पाथरी) आदींच्या प्रमुख उपस्थीतीत प्रथम सर्वांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन उपस्थीत प्रमुख गुरुवर्यांनी मनोगत व्यक्त करत आपनही शिवैक्य शि.भ.प. श्रीमती महादेवीअक्का महाजन,(प्रसिद्ध किर्तनकार,सोनपेठकर) अक्का व्हा असे अवाहन केले,मंगल आरती व प्रसादाने सांगता करण्यात आली याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी पुष्प अर्पण करुन पुष्पांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या