💥पुर्णा तालुक्यातील देऊळगाव येथे गाडगेबाबा जयंती निमित्त ग्रामस्वच्छता अभियान....!


💥वृक्षांचा केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा💥 

✍️लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी)

ताडकळस येथून जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे(ता.पुर्णा) येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या  वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबवून दि. २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन केले . गतवर्षी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन देऊळगाव येथील जिजाऊ स्मृती उद्यान व वैकुंठधाम स्मशानभुमीत दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजी एक हजार झाडे लावण्यात आली होती .त्यावेळी लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या एक हजार झाडांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने गावकरयांच्या वतीने झाडांना पुष्प हार अर्पण करून साजरा करण्यात आला .

यावेळी संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करुन देऊळगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छतेस मुख्य  प्राधान्य दिले आहे . ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमीत्ताने गावातील नाल्या व गटारांची स्वच्छता करण्याची मोहिम हाती घेतली होतीश. त्याच बरोबर शिवजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर स्वच्छतेचे देवदूत संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचा संदेश देणारे उपक्रम राबवून साजरी करण्यात आलीश . यावेळी देऊळगाव नगरीच्या सरपंच सौ. ललिताबाई उत्तमराव कांबळे, उपसरपंच डिगांबर दुधाटे, सदस्य विशाल दुधाटे, उध्दव बालासाहेब दुधाटे, उध्दव दुधाटे यांच्या हस्ते उद्यानात लावण्यात आलेल्या वृक्षांना पुष्पहार अर्पण करुन वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी वैकुंठधाम स्मशानभुमी व जिजाऊ स्मृती उद्यानाच्या विकास कामात पुढाकार घेणारे बळीराम दुधाटे, गोविंदराव दुधाटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगनाथ दादा दुधाटे, ज्ञानोबा दुधाटे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उत्तमराव कांबळे, पोलीस पाटील शिवाजी दुधाटे, उध्दव दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, रामेश्वर दुधाटे, पांडूरंग बकाल, कार्तीक दुधाटे, प्रमोद दुधाटे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . दरम्यान ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावातील ग्रामस्थांनी हातात झाडू घेवून जिल्हा परिषद शाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व जिजाऊ स्मृती उद्यान ,वैकुंठधाम स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या