💥तंबाखू सेवन व धूम्रपानाने फक्त फुप्फुसांचा आणि तोंडाचाच नव्हे तर अजून शरीरात बरेच कॅन्सर होऊ शकतात...!

💥फुप्फुसाच्या कॅन्सरच्या प्रत्येक १० पेशंटपैकी ९ पेशंटमध्ये तंबाखू कारणीभूत💥

तंबाखू आणि कॅन्सरचा संबंध विचारला असता बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो सिनेमा हॉल मध्ये पिक्चर सुरु होण्यापूर्वी येणारा 'मुकेशचा' चेहरा आणि डोक्यात येतो तोंडाचा आणि फुप्फुसांचा कॅन्सर

तंबाखू सेवनाने आणि धूम्रपानाने फक्त फुप्फुसांचा आणि तोंडाचाच  नव्हे तर अजून शरीरात बरेच कॅन्सर होऊ शकतात फुप्फुसाच्या कॅन्सरच्या प्रत्येक १० पेशंटपैकी ९ पेशंटमध्ये तंबाखू कारणीभूत आहे .


१. तंबाखू सेवन आणि धूम्रपानाने होणारे कॅन्सर -  फुप्फुसाचा कॅन्सर , तोंडाचा व मानेचा कॅन्सर , घश्याचा कॅन्सर , रक्ताचा कॅन्सर , मूत्रपिंड व मूत्राशयाचा कॅन्सर , गर्भाशय व गर्भाशयग्रीवेचा कॅन्सर , अन्ननलिका व जठराचा कॅन्सर , यकृत कॅन्सर , स्वादुपिंडाचा कॅन्सर , आतड्यांचा कॅन्सर . 

२. सिगारेट व बिडीच्या धुरात आणि तंबाखू सेवनाच्या पदार्थात ७००० पेक्षा जास्त रसायने /केमिकल्स असतात आणि त्यापैकी ७० पेक्षा जास्त केमिकल्स शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता असणारे आहेत हे सिद्ध झाले आहे (Carcinogen) . हे केमिकल्स फक्त कॅन्सर चा नाही तर हृदयाचे आणि फुप्फुसाचे इतर आजाराला कारणीभूत आहेत . 


३. ह्यामुळे कॅन्सर नेमका होतो कसा ? 

तंबाखूसोबतची हे केमिकल्स जेंव्हा शरीरात जातात तेंव्हा आपल्या पेशींमधील डीएनए ला नुकसान पोहचवतात . डीएनए   मुळे संतुलन राखून नवीन पेशींची निर्मिती होत असते . डीएनए (DNA) नुकसान झालेल्या पेशी असाधारपणे   वाढायला लागतात आणि ह्या असाधारण पणे वाढणाऱ्या पेशींचे रूपांतर पुढे कॅन्सर मध्ये होते .

४. पॅसिव्ह स्मोकिंग /सेकंड हॅन्ड स्मोकिंग म्हणजे काय ? (PASSIVE SMOKING/SECOND HAND SMOKING)

स्वतः धूम्रपान न करता , इतरांच्या धुम्रपानामुळे निर्माण झालेला धूर जेंव्हा श्वसनांमधून फुप्फुसात जातो ह्यामुळे पण कॅन्सर  होऊ शकतात . 

५. मी माझी कॅन्सरची रिस्क कमी करू शकतो का ? तंबाखूमुळे होणारे कॅन्सर टाळू शकतो का ? 

  हो . १. जर तुम्ही तंबाखूचा वापर करत नसाल तर - भविष्यातही करू नका आणि तुमच्या प्रियजनांना तंबाखूचा वापर सोडण्यासाठी प्रोत्साहित करा . 

        २ . आणि तुम्ही तंबाखूचा वापर करत असाल तर -ते आजचा सोडा , 

   तंबाखूचा वापर सोडल्यावर हे कॅन्सर होण्याची रिस्क/धोका  जवळपास अर्ध्याने कमी होते .  

जर तंबाखूचा वापर सोडताना शारीरिक / मानसिक त्रास होत असतील तर त्यासाठी विविध वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध आहेत ( मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला /निकोटीन चुईंग गम / निकोटीन पॅच ).

६. मला आधीच कॅन्सर झालाय , आता काय फायदा ?

कॅन्सर रुग्णांमध्ये - तंबाखूचा वापर सोडल्याने होणारे फायदे - 

यशस्वी उपचार , उपचाराचे कमी साईड इफेक्ट्स , लवकर होणारी रिकव्हरी , वाढीव आयुष्यमान , पुन्हा कॅन्सर वापस येण्याचा  कमी धोका , नवीन दुसरा कॅन्सर होण्याचा  कमी धोका .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या