💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवारी आढळले १९ कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीत रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू💥

परभणी (दि.९ फेब्रुवारी) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज मंगळवार दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी १९ कोरोनाबाधित रुग्ण  आढळले असून शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या ४ कोरोनामुक्त रुग्णांना आज रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २ कोरोनाबाधित पुरुषांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ६० रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आजपर्यंत ३१७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार २२ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ७ हजार ६४५ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे....

जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख १६ हजार ८२५ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ८ हजार ३४५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ७ हजार ८२३ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५१७ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचेही प्रेसनोटव्दारे सांगण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या