💥पुजा चव्हाण कथीत आत्महत्ये संदर्भात बंजारा क्रांती दलाने राज्य सरकारला दिले १ मार्च पर्यंतचे अल्टीमेटम....!

 


💥मंत्री संजय राठोड यांच्यासह अन्य दोघांची नार्कोटेस्ट व घटनेची सिबीआय चौकशी करा - देविदास राठोड  

नांदेड (दि.२५ फेब्रुवारी) - संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील पुजा चव्हान कथीत आत्महत्या प्रकरणी पिडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आता बंजारा क्रांती दल मैदानात उतरसे असून बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी राज्य सरकारला सखोल चौकशी करण्यासाठी १ मार्च २०२१ पर्यंतचा अल्टीमेटम दिला असून या घटनेची सिबीआय मार्फत चौकशी करावी व राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यासह प्रकरणात नावे समोर येत असलेल्या अन्य दोघांची सुध्दा  नार्कोटेस्ट करण्याच्या मागणीची घोषणा राज्य सरकारकडे केली आहे.बंजारा क्रांती दलाच्या मागणीचा राज्य सरकारणे गांभीर्याने विचार केला नाही तर येत्या १ मार्च २०२१ बंजारा क्रांती दल राज्यभर बोम्बाबोम्ब आंदोलन करणार असल्याचा इशारा ही देविदास राठोड यांनी दिला असून पुजा चव्हाण आत्महत्ये संदर्भात बोलतांना बंजारा क्रांती दलाचे नेते राठोड म्हणाले की संजय राठोड स्वताला निर्दोष समजतात तर त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे खुले आवाहन त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या