💥राज्यातील प्रत्येक पंचायत समितीत प्रत्येक ३ महिन्यास एकदा सरपंच सभा होणार...!

💥राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाचा निर्णय पंचायत समिती बीडीओंना शासनाचा आदेश💥

परभणी (दि.९ फेब्रुवारी) - राज्यातील प्रत्येक पंचायत समितीअंतर्गत सरपंचांची प्रत्येक ३ महिन्यास सभा घ्यावी असे आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने आज मंगळवार दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत.

ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या अनेक तक्रारी, निवेदने मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. या बाबीचा विचार घेऊनच सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकार्‍यांनी प्रत्येकी तीन महिन्यांनी सरपंचांची सभा घ्यवीच, अशा सूचना ग्रामविकास मंत्रालयाने दिल्या आहेत. संबंधित गटविकास अधिकार्‍यांनी त्याबाबत नियोजन करावे, विस्तार अधिकारी, इतर कर्मचारी, संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी या बैठकांमधून ग्रामपंचायतीअंतर्गत कामासंदर्भात तक्रारी, गार्‍हाणी व अडीअडचणींबाबत विचार करावा. विशेषतः ज्यादिवशी तक्रार निवारण दिन आहे, त्याचदिवशी सरपंच सभेचे आोयजन करावे, असे स्पष्ट आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या