💥वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील सिध्दार्थ विद्यालयाचे विद्यार्थी फिल्ड आर्चरी स्पर्थेत राज्यस्तरावर...!


💥विद्यार्थ्यांच्या या यशाकरीता त्यांना संस्था सचिव अशोक कांबळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.कांबळे यांनी दिल्या शुभेच्छा💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर (दि.५ फेब्रुवारी) -येथे बुधवार दि.०३ फेब्रुवारी २०२१  रोजी झालेल्या जिल्हास्तरीय फिल्डआर्चरी स्पर्धामध्ये सिध्दार्थ विद्यालयाचे विद्याथीं वयोगट १४ वर्ष गटामध्ये १) सात्वीक रामदास गांवडे २) जय प्रविण भोयर ३)आज्ञाराम सुखराम चव्हाण व मुलीच्या १४ वर्षे वयोगटामध्ये १)कु.पुनम संजय श्रुगांरे २) कु. ज्ञानेश्वरी किशोरी आमटे ३) कु साक्षी श्याम मर्दाने विजयी होऊन दि.६ फेब्रु.ते ८ फेब्रु २०२१ या कालावधी मध्ये वाय सि.कॉलेज वारणानगर कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धा करीता निवड झाली आहे.             विद्यार्थ्यांच्या या यशाकरीता त्यांना संस्था सचिव  अशोककांबळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. किरण कांबळे ,पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना मार्गदर्शन क्रिडा शिक्षक जगन्नाथ उगले व अनिल मनवर यांचे लाभले. विद्यालयातील शिक्षक दिपक  घुले,जगताप,तेलंग,राऊत, व्यवहारे,जीवने,सोनोने, रघूवंशी,चव्हान ,वाघमारे, देशमूख ,भोयर,सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी पूढील स्पर्धा करीता शुभेच्छा दिल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या