💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील शेतकऱ्याच्या मुलगा एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण....!


💥शेतकऱ्याच्या कर्तृत्ववान सुपुत्राची पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड💥      

 पुर्णा (दि.१४ फेब्रुवारी) तालुक्यातील धनगर टाकळी येथील शेतकरी कुटुंबातील जगन्नाथ मुरलीधरराव शेरकर या कर्तृत्ववान सुपुत्राची पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांचे शिक्षण - एम.ए. औरंगाबाद येथुन(मानसशास्त्र) एम.एड.बुलढाणा येथून,सध्या नांदेड येथे सिडको ग्रामीण पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलिस म्हणून कार्यरत आहे .वडील मुरलीधरराव मारोतराव शेरकर (शेतकरी) विद्याप्रसारिणी सभेचे हायस्कुल पूर्णा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, प्राथमिक शिक्षण राष्ट्रमाता धनगर टाकळी  येथुन पूर्ण केले. 


********************************************

 💥आई गांधारीबाइ वडील मुरलीधरराव यांची प्रतिक्रिया💥 

       आई वडीलांची  इच्छा होती तीन क्षेत्रात मुलांनी नौकरीला लागावे त्याचप्रमाणे   पोलिस खात्यात  गजानन शेरकर , प्राथमिक शिक्षक रंगनाथ शेरकर , माध्यमिक शिक्षक कैलास शेरकर   या तिघांनीही मनासारखे केल्याने खुप आनंद झाला अशी सकाळशी प्रतिक्रिया दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या