💥पूर्णेतील रेल्वे कम्युनिटी हॉल परिसरात जुगार अड्यावर पोलिसांची धाड....!

 


💥प्रभारी पो.नि.बि.पी.चोरमले यांची अवैध धंद्यांच्या विरोधात धडक कारवाई; ६९ हजाराचा रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.१२ फेब्रुवारी) - पूर्णा पोलिस स्थानकाचे प्रभारी पो.नि.बि.पी चोरमले यांनी पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार स्विकारताच शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात रणशंख फुंकल्याचे निदर्शनास येत असून काल गुरूवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ७-३० वाजेच्या सुमारास पुर्णा पोलिसांनी  शहरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या बाजुस बेकायदेशीर चालत असलेल्या जुगार अड्यावर धाडसी कारवाई करीत झन्ना-मन्ना जुगार खेळणार्‍या ५ जुगारड्यांविरूध्द कारवाई करीत त्यांच्याकडून १८ हजार ४७० रोख रकमेसह एरूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


शहरातील रेल्वे परिसरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या बाजूस काही व्यक्ती बेकायदेशीररित्या झन्ना-मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती पूर्णा पोलिस स्थानकाचे प्रभारी पो.नि. बि.पी. चोरमले यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, बिट जमादार नितीन वडकर,पोकॉ.समीर अख्तर पठाण,मंगेश जुक्टे, श्री.जाधव, पवार आदींना तात्काळ जुगार अड्यावर धाड टाकून जुगारड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

पुर्णा पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून रेल्वे कम्युनिटी हॉल परिसरात धाड टाकली त्यावेळी तेथे सिध्दार्थ खरे, मोहमद निसार मोदम रौफ, सूर्यकांत जगताप, अजय नरवाडे, अशोक खरे, हे झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पथकाने या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याजवळील १८ हजार ४७० रुपये जप्त केले. त्याचबरोबर मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान,या प्रकरणी मंगेश जुक्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार नितीन वडकर हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या