💥तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट...!


💥भयंकर स्फोटात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू💥

 तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांच्या फॅक्टरीत  शक्तीशाली स्फोट झाला.यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.कालायर्ककुरीची कारखान्यात हा स्फोट झाला.अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.स्फोटानंतर अग्निशमन दलाचे जवान लगेच घटनास्थळी पोहोचले. आता आग विझवण्याचे काम सुरु आहे. 

दोन आठवड्यानंतर पुन्हा एकदा फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटाची घटना घडली आहे. शिवकाशीमध्येच सात्तुर येथे फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला होता.फटाक्यांच्या निर्मितीसाठी रसायने मिसळण्याची प्रक्रिया सुरु असताना, हा स्फोट झाला होता. शिवकाशी हे भारतातील फटाका निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या