💥अमेरिकेत लोकसंख्या असलेल्या टेनिसीत करोना लसीची चोरी...!


💥चौकशी करण्यासाठी केंद्रीय कायदा अंमलबजावणी संस्थेला पाचारण💥 

वृत्तसंस्था, नॅशव्हिले :- अमेरिकेत जास्त लोकसंख्या असलेल्या टेनिसीत लशीची चोरी झाली असून त्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय कायदा अंमलबजावणी संस्थेला पाचारण करण्यात आले आहे.यात दोन मुलांचे अवैध पद्धतीने लसीकरण करण्यात आले असून ही लस लहान मुलांसाठी नसतानाही त्यांना देण्यात आली गेल्या महिन्याभरात गैरमाहिती व अपुऱ्या नोंदींमुळे लशीचे २४०० डोस शेल्बी परगण्यात वाया गेले असून तेथे एकूण तीस हजार अतिरिक्त लशींचा साठा करण्यात आला होता. 

आरोग्य आयुक्त लिसा पिअर्सी यांनी लस चोरीच्या आरोपांची माहिती देण्यास नकार दिला असून शेल्बी परगण्याच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे की लस चोरीला गेल्याबाबत आम्ही प्रशासनास सतर्क केले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेला या प्रकरणी चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.पिअर्सी यांनी सांगितले, की लशीचे डोस काही स्वयंसेवकांनी चोरून नेले असे सांगितले जात असले तरी त्या केवळ सिरींज होत्या.

 एफ.बी.आय.ला या परिस्थितीची कल्पना देण्यात आली असून एफ.बी.आय.चे प्रवक्ते जोएल सिस्कोविक यांनी सांगितले, की याबाबत चौकशी चालू आहे किंवा नाही याबाबत आपण काही सांगू शकत नाही. एका व्यक्तीने तीन फेब्रुवारीला दोन मुलांना लस दिली. ही मुले आईसमवेत लसीकरण केंद्रावर आली होती.त्या तिघांनाही वेळ देण्यात आलेली होती.या मुलांना दुसरी मात्रा दिली किंवा नाही हे समजू शकले नाही.एकूण लशीचे २४०० डोस वाया गेले असून ६४ लशीच्या कुप्या कचऱ्यात टाकण्यात आल्या.१२ मात्रांचा हिशेब लागलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या