💥विद्यापीठांमध्ये घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संवाद परिषदांच्या पूर्व परवानगीची नव्याने घातलेली अट काढा...!


💥विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन💥

गंगाखेड (दि.१८ फेब्रुवारी) - भारताने 1991 साली जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, या धोरणाचा  स्वीकार केला. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील संपूर्ण बाजार पेठ खुली झाली.या खुल्या बाजारपेठेत सोबतच अनेक गोष्टी खुल्या झाल्या त्यात शिक्षणही आले.

इतके सर्व असून भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद,परिसंवाद,चर्चासत्र,आयोजित करायचे असेल,तसेच त्यात समाविष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण,संशोधन,राजकारण,अर्थकारण इत्यादी विषयातील जगप्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग आणि मार्गदर्शन यांचे आयोजन करण्याबाबत संपूर्ण भारत देशातील विद्यापीठांना,परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत  पूर्व परवानगीची घेणे बंधनकारक करणारा ,ईशान्य भारतातील राज्य,जम्मू-काश्मीर,लडाख या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदा घेण्याला पूर्णपणे बंदी घालणारा निर्णय आपण घेतला आहे.

         महाराष्ट्र राज्य तथा भारत देश पातळीवर, शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी, विद्यार्थी -विकास ,शैक्षणिक धोरण या सर्व गोष्टींबाबत महाराष्ट्र राज्यातील एक सजग आणि जागरूक विद्यार्थी संघटना या नात्याने वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद(VBVP) च्या वतीने, तुम्ही घेतलेल्या हास्यास्पद निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो व हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा  अशी मागणी करत आहोत.

या वेळी उपस्थित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सचिव शिवश्री अर्जून चव्हाण, उपाध्यक्ष प्रसाद धापसे,    कार्याध्यक्ष विकास राठोड,  सहकोषाध्यक्ष अमित बोबडे, प्रवक्ता श्रावण चौधरी, प्रसिद्धी प्रमुख वेदांत भिसे, गजानन सायकर ,अनिल बोबडे ,मारोती ,रहमान शेख, मुंजाजी बोबडे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या