💥पुर्णेतील भारतीय स्टेट बँकेत सरपंच शरद कदम पाटील यांचा सत्कार....!


💥बँकेतील विविध योजनांची माहिती देण्यासाठी करण्यात आले होते सरपंच मेळाव्याचे आयोजन💥

पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - येथील भारतीय स्टेट बँकेतील सर्व लोकोपयोगी योजनांची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरिता भारतीय स्टेट बँकेच्या पुर्णा शाखेत सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


भारतीय स्टेट बँक शाखेत आयोजित सरपंच मेळाव्यात यावेळी तालुक्यातील सोन्ना गावचे सरपंच शरद कदम पाटील यांचा यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने शाखा व्यवस्थापक राजेश कंधारकर व कर्ज वितरण अधिकारी प्रमोद चाबुकस्वार यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे,ऋषी मोरे व दत्तक गावचे सर्व सरपंचांना बँकेच्या विविध योजनेची माहिती शाखाधिकारी कंधारकर यांनी दिली आणि सरपंच यांच्या सूचना ऐकून घेतल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या