💥वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनाच विनामास्क संदर्भात भरावा लागला दंड.....!


💥प्रशासकीय नियमांची प्रशासनातील अधिकारीच करताय पायमल्ली मग जनतेकडुन कसली अपेक्षा करताय ?💥

वाशिम (दि.१८ फेब्रुवारी)-कोरोणासंदर्भात वाशिम प्रशासन पुन्हा अॅक्शन मोडवर आल्याने विनामास्क फिरणारांवर कायदेशिर कारवाई करुन दंड आकारला जात आहे.परंतु अधिकारीच बिनधास्त तिथे जनतेकडुन सहकार्याची काय अपेक्षा करावी असा प्रश्न आता मंगरुळपीर तालुकावाशीयांना पडला आहे.कारण असे की विनामास्क असल्यामुळे मंगरुळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकांनाच ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी दंड केला असुन कायदा हा सर्वासाठीच आहे त्यामुळे नागरीक असो वा प्रशासनातील अधिकारी सर्वांनीच नियमांचे पालन करावे असा आदर्श या कारवाईतुन निर्माण करुन दिल्याने पोलिस दलाचे सर्वञ कौतुक होत आहे.


पुन्हा एकदा कोरोनाने वाशिम जिल्ह्यात डोके वर काढल्यामुळे कोरोणात्मक प्रतिबंधक ऊपायासाठी प्रशासनही जोमाने कामाला लागले आहे.दिनांक १७ फेब्रुवारीच्या मध्यराञीपासुन संचारबंदीही लागु केली असुन सर्वांनी नियमांचे पालन करा आणी स्वतःसोबतच इतरांच्या आरोग्याची घेन्यासाठी प्रशासनाने सांगीतलेल्या ञिसुञीचे पालन करा असे आवाहनही करन्यात आले आहे.पोलिसदलासह सर्व प्रशासकीय यंञणाही पुन्हा एकदा कोरोनासंदर्भात अॅक्शन मोडवर आलेल्या असतांनाच प्रशासकीय अधिकार्‍यांकडुनच नियमांची पायमल्ली केल्या जात असल्याचे ऊदाहरण मंगरुळपीर येथे घडले आहे.चक्क मंगरुळपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे विनामास्क अाढळल्यामुळे ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांनी त्यांना दंड केला असुन कायद्याचे पालन करन्याच्या सुचना दिल्या आहेत.इथे अधिकारीच बिनधास्त तिथे नागरीकांकडुन कसली अपेक्षा करायची?असे चिञ निर्माण झाल्याने कायदा हा सर्वासाठीच आहे हे या कारवाइमधुन ऊपविभागिय पोलिस अधिकार्‍यांनी ऊदाहरण घालुन दिल्याने पोलिस विभागाचे सर्वञ कौतुक होत आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या