💥पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरूच...!

 


💥सर्वपक्षीय धरणे आंदोलनाचा आज ९ वा दिवस; नगर परिषद प्रशासनाची भुमीका संशयास्पद💥

पुर्णा (दि.१३ फेब्रुवारी) - शहरातील डॉ.आंबेडकर चौक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण धारकांनी बेकादेशीरपणे अतिक्रमण करून आपली दुकान थाटली तर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केलेली दुकान भाडेतत्वावर देऊन मलिदा लाटण्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासून चालवला असून संबंधित अतिक्रमण धारकांमुळे महापुरूषांच्या सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांनाही नगर परिषद प्रशासन वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत असल्याने प्रतिष्ठित नागरीक तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून यापुर्वी सुध्दा अनेक वेळा अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन झाली परंतु या अतिक्रमणाच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून ही कुठलाच तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला नसल्याने शेवटी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी दि.५ फेब्रुवारी २०२१ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी पुर्णा नगर परिषदे समोर धरणे आंदोलनास सुरूवात केली असून या धरणे आंदोलनाला आज शनिवार दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी ९ दिवस उजाडला असतांना सुध्दा मठ्ठ झालेल्या नगर परिषद प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊन उचलले गेले नसल्यामुळे तमाम आंबेडकरवादी जनतेत संताप व्यक्त होत असून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवावी तमाम आंबेडवादी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नयें अशी संतप्त प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या