💥सहकार क्षेत्रातील रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी गेली भाडेतत्त्वावर...!


💥राज्याचे माजी सहकार वस्त्रोद्योग मंत्री तथा साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी दिली माहिती💥

हिंगोली (दि.२५ फेब्रुवारी) - जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा येथील रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी ची स्थापना दि.१० फेब्रुवारी २००८ रोजी स्थानिक पातळीवरील बेरोजगार तरुणांसाठी नौकरी उपलब्ध व्हावी या हेतूने सुरू करण्यात आली होती पण मध्यंतरी तिन ते चार वर्ष रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी डबघाईला आल्यामुळे बंद ठेवण्यात आली होती आता मात्र रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली आहे अशी माहिती दिल्ली साखर महासंघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाशजी दांडेगांवकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. 

रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी साठी किती कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता किती निधी सुत गिरणीच्या कामकाजासाठी वापरण्यात आला होता किती कोटींची कमाई सुत गिरणीने करुन दिली पण सहकार क्षेत्रातील रोकडेश्वर सहकारी सुत गिरणी भाडेतत्त्वावर देण्याची गरज का आली ? रोकडेश्वर सहकारी सुत गिरणीवर किती कोटीचे कर्ज उचलले गेले का ? कर्ज उचलले उचलले गेले असेल तर मग त्या कर्जाची परतफेड का वेळेवर केली गेली नाही ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या