💥परभणी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नवनी पर्यंतच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत राहणार बंद..!


💥जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र सुरू राहतील; जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी (दि.२० फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्वच वर्गांच्या शाळा येत्या २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शनिवार दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील शासकीय शाळांसह खाजगी शिक्षण संस्थांनाही दिले आहेत परंतु इयत्ता दहावी व बारावी व्यतिरीक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.


परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षणक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बजावले आहेत. 

इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी नियमित शाळेत अध्यापनाचे कार्य व आवश्यकती कामे करावित. इतर सर्व शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या