💥पुर्णा नगर परिषदे समोर विविध नागरी सुविधांच्या मागणीसाठी करण्यात आले आंदोलन...!

💥आंदोलनात डिवायएफआयचे जिल्हासचिव नसीर शेख यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.५ फेब्रुवारी) - पूर्णा नगर पालिके समोर आज शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी येथे विविध नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन कर्त्यांनी नगर पालिका प्रशासनाने मागण्यांची ताबडतोब पुर्तता करावी अशी मागणी केली. 

आंदोलन कर्त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये शहरातील मुख्य रस्ता तात्काळ कायमस्वरूपी व्हावा,शहरात एक बगीचा अर्थात उद्यानची  निर्मिती करण्यात यावी,शहरातील विविध भागातील नाल्यांची व कचऱ्याची नियमित सफाई व्हावी व त्याचे नीट व्यवस्थापन व्हावे, इकबाल नगर येथील सभागृहाशी संबंधित समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात व खेळाच्या मैदानाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात डिवायएफआयचे जिल्हासचिव नसीर शेख,अमन जोंधळे,आंनद वाहिवळ, भीमा वावळे, पांडुरंग दुथडे, हर्षवर्धन अहिरे, अजय खंदारे, जलील कुरेशी गंगाधर लोंढे, जाकेर शेख, जहिर, सोमेश सावळे, सय्यद फारुख, शेख अल्लाबक्ष, संदीप थोरात, आनंद कांबळे व इतर जण सहभागी होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या