💥परभणी जिल्ह्यात आज सोमवारी आढळले २२ कोरोनाबाधित रुग्ण.....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ३२१ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यूची नोंद💥

परभणी (दि.२२ फेब्रुवारी) - शहरासह जिल्ह्यात आज सोमवार दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या २२ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.


जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात १८६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर जिल्ह्यात आजपर्यंत ३२१ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार २९० कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ७८३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख २२ हजार ६९५ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख १२ हजार २६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ९१ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५६३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या