💥कोरोनाच्या जनजागृतीसाठी "व्होकल फोर लोकल" पूर्णेचा अविष्कार कला पथक रस्त्यावर....!


💥जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी व्हिकल फोर लोकल रथाचे हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून केले उद्घाटन💥                            

पूर्णा (दि.२८ फेब्रुवारी) - केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम व्हिकल फोर लोकल या चित्ररथात गीतगायनाच्या माध्यमातून जनजागृती अभियाना परभणी जिल्ह्यात सुरवात झाली आहे.जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दि.२६ फेब्रूवारी रोजी या व्हिकल फोर लोकल रथाचे हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश वडदकर,उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.या रथातून पूर्णा येथील शाहिर विजय सातोरे यांच्या अविष्कार कला मंच पूर्णाच्या माध्यमाने कलाकार आणि त्यांच्या संचच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. लोकल फॅार व्होकल  हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य  कार्य या जनजागृती अभियानातून केल्या जात आहे.  तसेच गाडीवर लावलेल्या  एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश चल जित्राद्वारे दाखविले जात आहेत.पुढील दहा दिवस  परभणी जिल्ह्यातील पुर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, जिंतुर तसेच प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागात या चित्ररथाच्या माध्यमातून अविष्कार कला मंचातून शाहिर व गायक विजय सातोरे,भिमराव राऊत,मोहन भुसावळे,सखाराम भिसे,सौ.अरूणा सावते,घनश्याम थोरात हे जनजागृती करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या