💥औरंगाबाद मध्ये आजपासून१४ मार्च पर्यन्त रात्रीची संचारबंदी लागु....!

 


💥या काळात जीवनावश्यक वस्तू,उद्योग,कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे💥

✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद (दि.२३ फेब्रुवारी) - शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. १४ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १४ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल. याकाळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग, कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार आहे.

दररोज शंभर ते दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिकेने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. एखाद्या कॉलनीत अथवा वसाहतीमध्ये वीसपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले तर तो भाग सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली....


✍️ मोहन चौकेकर


̤̤

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या