💥परभणी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्यानंतर ही प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघन...!

 


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उतरले कारवाईसाठी रस्त्यावर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू💥 

परभणी (दि.२३ फेब्रुवारी) - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्यानंतर सुध्दा सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारीवर्गाकडून खुलेआमपणे प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत बेजवाबदार नागरिकांसह व्यापाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे.


उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधुन फेरफटका मारत होते. विशेषतः या पथकाने कारवाई सुरू केल्या पाठोपाठ जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर हे स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील आरआर टॉवर, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड, वगैरे भागात पायी फेरफटका मारत जिल्हाधिकार्‍यांसह पथकाने काही वाहनधारकांना समज दिली. काहींना दंड ठोठावला. व्यापार्‍यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे सुनावले. 

जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या ताफ्याने व्यापारी पेठांमध्ये मोठी खळबळ उडाली. पथकाच्या धास्तीने व्यापार्‍यांनी वाहनधारकांनी पटापट मास्क तोंडावर चढवले. तसेच दुकानांमधून सॅनिटायझरच्या बाटल्या काऊंटवर ठेवल्या, गर्दीची ठिकाणे या कारवाई पाठोपाठ ओस पडली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या