💥परभणी जिल्ह्यात विदर्भातील ११ जिल्ह्यातून होणाऱ्या वाहतुकीस प्रतिबंध....!


💥जिल्ह्यात येणार्‍या व विदर्भात जाणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध जारी केले💥

परभणी (दि.२३ फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी विदर्भातील ११ जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणार्‍या व विदर्भात जाणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध जारी केले आहेत.


विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणार्‍या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंध जारी केले आहेत. याबाबतचे आदेश मंगळवार दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी काढले. या प्रतिबंधातून पूर्वपरवानगीने अत्यावश्यक सेवेस सूट देण्यात येईल,असेही आदेशात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या