💥पूर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून असलेले अतिक्रमण त्वरित काढावे.....!


💥भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥

पूर्णा (दि.९ फेब्रुवारी) - शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पन्नास वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा शासनाच्या परवानगीने बसविण्यात आला नंतरच्या कालखंडामध्ये पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले.या संदर्भामध्ये वेळोवेळी शासन दरबारी अतिक्रमण उठविण्यासाठी सनदशीर मार्गाने निवेदने व आंदोलने करण्यात आली. परंतु अतिक्रमणे काही उठले नाहीत. शासनाने याबाबतीत चाल ढकल केली.


परिसरातील अतिक्रमणांमुळे पुतळा परिसराचं सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आलेले आहे आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे याबाबतीत यांनी याबाबतीत लक्ष घालून त्वरित अतिक्रमण हटविण्याचे आदेश द्यावेत. व पुतळ्याचे सुशोभीकरण करून पूर्णाकृती पुतळा बसवावा अशा प्रकारची मागणी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी निवेदनाद्वारे केली आहे...

*********************************************

💥भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो दि.१० फेब्रुवारी रोजी अतिक्रमण विरोधी जन आंदोलनात सहभागी होऊन संबोधित करणार💥


दिनांक 10 फेब्रुवारी 2021 दुपारी बारा वाजता  डॉ.उपगुप्त महाथेरो उद्या दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२-०० वाजता नगर परिषदे समोर सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी जन आंदोलनात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत हा अत्यंत जिव्हाळ्याचा व आंबेडकरी समाजाच्या अस्मितेच्या प्रश्न असल्याने या संदर्भातील जन आंदोलानाच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आव्हान रिपाई नेते व संविधान गौरव समितीचे प्रमुख प्रकाश कांबळे यांनी केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या