💥कामाच्या ठिकाणी लोकप्रियता कायम जोपासणारे संवेदनशील मनाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यशवंत केडगे.....!


💥पोलीस खात्यातील अतिशय संवेदनशील मनाचे मृदू स्वभावाचे शांतता प्रिय अधिकारी म्हणून श्री केडगे परिचित 💥

फुलचंद भगत...✍️

मंगरूळपीर (दि.19 फेब्रुवारी) - काही दिवसापूर्वी कोरोना अर्थात कोरोना महामारी कोविड-१९ चा सेकंड पार्ट सुरू झाला,आणि वर्दीच्या,सुरक्षितते वरती,पुन्हा एकदा ताण पडला. त्यातच राज्य सरकारचे मास्क लावण्या बाबत चे धोरण अतिशय कडक झाल्याने,त्याची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही पोलिस खात्यावरती येऊन पडली होती.वर्दी ही हुकुमाचे ताबेदार असते.

त्यातच अंमलबजावणीची जबाबदारी पडली असताना,वाशिम जिल्ह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी,श्री यशवंत केडगे सो,यांनी थेट मंगरूळपीर वाशिम च्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी याच्यावर मास्क न लावण्याने दंडात्मक कारवाई केल्याने,संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

कारवाईचा बडगा थेट नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारत,कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवून दिले.श्री केडगे हे मूळचे कोल्हापूरचे सुपुत्र.वडिलांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना लाभलेला वारसा,श्री केडगे हे,कामाचे ठिकाणी आपल्या कर्तव्यदक्ष,व सचोटीने काम करण्याच्या पद्धतीमुळे,कामाच्या ठिकाणी पोलीस खात्यातील लोकप्रिय अधिकारी म्हणून सर्वदूर परिचित आहेत.पोलीस खात्यातील अतिशय संवेदनशील मनाचा,मृदू स्वभावाचे शांतता प्रिय अधिकारी म्हणून श्री केडगे,परिचित आहेत.सौजन्य पूर्वक आणि शांतता पूर्व, त्यांच्याकडे आलेल्या माणसाची वेदना,व्यथा, समजून घेऊन त्यातून ते मार्ग काढून देताना बऱ्याच वेळा दिसून आलेले आहेत.श्री केडगे यांचा पोलीस खात्यातील,कामाचा दांडगा अनुभव लक्षात घेता,तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी, श्री केडगे यांचे मुख्यमंत्री कार्यालयातून, अभिनंदन पर पत्र लिहून,श्री केडगे यांच्या विशेष कामाचे कौतुक केले होते.

श्री केडगे आणि कोल्हापूर,यांचे खूप मोठे जवळचे नाते आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या कोल्हापूरच्या टोल प्रकरणी,तत्कालीन आघाडी सरकारच्या कारकिर्दीमध्ये,तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंग यांनी टोल आंदोलनाच्या अंतिम दिवशी, जमावाचे वरती गोळीबार करण्याचे निर्देश,तत्कालिन पोलिस  उप अधीक्षक शहर,श्री. विठ्ठल पवार यांना दिले होते.श्री केडगे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.मात्र तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, श्री पवार, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालिन श्री यशवंत केडगे, व तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी श्री आप्पासाहेब धुळाज, यांनी आंदोलकांच्या,वरती ठामपणे गोळीबार करण्यास नकार दिल्याने,कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका,असले बाबतचे पत्र तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंग यांनी मंत्रालयातील गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला,लिहून, तत्कालीन पोलीस उपाधीक्षक श्री विठ्ठल पवार कोल्हापूर शहर व शाहूपुरी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालीन यशवंत केडगे यांच्या वरती निलंबनाच्या कारवाईची चा, बडगा उगारला गेला होता तसेच,तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांची,नागपूरला तात्काळ बदली करण्याचे आदेश एका राज्यमंत्र्यांनी दिले होते.खरंतर टोलचा कोल्हापुरी टोला हा आयआरबीला द्यायचा होता.मात्र प्रशासकीय खुन्नस,उभी टाकल्याने,सेवानिवृत्तीच्या वाटेवरती अवघ्या काही दिवस असलेले तत्कालिन पोलिस उपाधीक्षकश्री.विठ्ठल पवार, व 

श्री यशवंत केडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालीन शाहूपुरी,यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते.वर्दीची सेवा प्रामाणिकपणे व अचूकपणे बजावत असताना,अशा चांगल्या अधिकाऱ्यांना,वेळ अप वेळी,अशा येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते.मात्र तरी देखील ते शेवटपर्यंत आपल्या तली माणुसकी विसरत नाहीत.कोल्हापूर शहरातील दर्शन  शहा खून खटल्या प्रकरणी,आरोपीस पकडण्या पासून ते त्याला  न्यायालयीन शिक्षा होण्यापर्यंत,तत्कालीन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना, कायदेशीर बाबींची पूर्तता करून,आरोपीस शिक्षा द्यावयास भाग पाडणारे लोकप्रिय पोलीस अधिकारी म्हणून,कोल्हापूरला,श्री यशवंत केडगे हे प्रसिद्ध आहेत.श्री केडगे यांना सातत्याने विविध विषयावरती वाचन करण्याचा दांडगा छंद आहे.त्यांना कायदेविषयक असलेला दांडगा अभ्यास,गुन्ह्याची उकल सोडवण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत,तपासाचे बाबतीत त्यांच्याकडून उचलली जाणारी तातडीची पावले,गुन्ह्याची उकल सोडवण्यासाठी त्यांच्याकडे असलेली तीक्ष्ण निरीक्षण क्षमता, शांततापूर्वक काम करण्याची त्यांची आगळी वेगळी पद्धत,काम करत असताना,पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना,विश्वासाने हाताळण्याची त्यांची ती लकब,श्री केडगे, यांच्या विविध कामाचे ठिकाणी,लोकप्रियता मिळवून देणारी ठरत आहे.वडिलांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना लाभलेला वारसा,श्री केडगे यांनी जोपासलेला आहे.

श्री केडगे यांचे मोठे बंधू मंत्रालयातील बांधकाम विभागाला उपसचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत,तर दुसरे बंधू हे,भारत सरकारच्या सेंट्रल एक्साइज च्या,कमिशनर पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत,श्री केडगे यांचा गोतावळा,नात्यातील व

नाते बाहेरील,खूप मोठा आहे.

विविध सामाजिक चळवळीशी ते नेहमी संपर्कात असतात.ग्रामीण व शहरी जीवन अतिशय जवळून बघितल्याने,वास्तवता परिस्थिती,आदींची त्यांना जाणीव आहे.स्वभावाने अतिशय शांत मृदू व मितभाषी असणारे,लोकप्रिय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे,आपल्या कामाचे ठिकाणी मात्र,कायद्याचा बडगा उघडताना मनाचा कठोर पणा कायम ठेवताना दिसून येतात.

काल त्याची चुणूक त्यांनी,मंगरूळपीर नगरपरिषद जिल्हा वाशिम येथील मुख्याधिकारी,यांना 500 रुपयांचा दंड भरावयास लावून,मास्क न लावल्याबद्दल कारवाई करून दाखवून दिली होती.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या