💥भारतात करोनाची दुसरी लाट ? मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले....!


💥आठवडाभरात देशात ३१ टक्के तर महाराष्ट्रात ८१ टक्के रुग्णवाढ💥

 भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील करोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेलाय.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिवसोंदिवस करोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे करोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे.धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झालीय.रविवारी करोनामुळे देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे.करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. 

करोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेलीय. म्हणजेच करोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी मात केलीय. असं असलं तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे.मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. 

फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये करोनाचे एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती.म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या