💥पुर्णा तालुक्यातील कानडखेडात नदीपात्रातून अवैध रेती उत्खननासाठी वापरले जाणारे ताफे जाळल्याची कारवाई फत्ते....!


💥पुर्णा पोलिस प्रशासन व महसुल प्रशासनाची सयुक्त कारवाई💥


पुर्णा (दि.५ फेब्रुवारी) तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून ताफ्यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध चोरट्या गौण खनिज रेतीचे उत्खनन करून त्या चोरट्या रेतीची तस्करी होत असल्याने तालुक्यातील महसुल प्रशासना व पोलिस प्रशासनाने काल दि.४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं.४-२५ वाजेच्या सुमारास रेती तस्करीला लगाम लागावा या दृष्टीने कानडखेड शिवारातील पुर्णा नदीपात्रात संयुक्त कारवाई करीत अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे ताफे जाळण्याची धाडसी कारवाई केली यावेळी महसुल प्रशासन व पोलिस प्रशासनाचे पथक येण्याची चाहूल लागताच रेती तस्करांनी या परिसरातून पळ काढल्याचे समजते यावेळी महसुल प्रशासनातील नायब तहसिलदार तलाठी मंडल अधिकारी आदींसह पुर्णा पोलिस स्थानकातील जमादार अर्जून रणखांब यांची प्रामुख्याने  उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या