💥परभणी जिल्ह्यातील सर्वच धार्मिकस्थळ येत्या ७ मार्च २०२१ पर्यंत राहणार बंद....!


💥धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास केवळ पाच व्यक्तींना परवानगी राहील💥

परभणी (दि.२७ फेब्रुवारी) - जिल्ह्यात कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच धार्मीक स्थळ येत्य ७ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शनिवार दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी दिले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता काही कालावधीकरिता बंद करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यात वाढ करत धार्मिक स्थळे आता सात मार्चपर्यंत बंद ठेवावित, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी शनिवारी सकाळी नव्याने जारी केले.

दरम्यान, धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी राहील, असेही आदेशात म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या