💥परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस स्थानकात दाखल चोरीच्या घटनेतील जप्त ऐवज मूळमालच्या स्वाधीन...!


💥पालम पोलिसांनी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते केला फिर्यादी चुडावेकर यांच्या स्वाधीन💥

परभणी (दि.२४ फेब्रुवारी) - जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आरखेड येथील घरफोडीतील चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज जप्त करत तो नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात घटनेतील फिर्यादी चुडावेकर यांच्या स्वाधीन करण्यात आला.

पालम तालुक्यातील आरखेड येथील गोविंद चुडावेकर यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून घरातील तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी करत घटनेतील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज जप्त केला. तो जप्त केलेला ऐवज संबंधितांना परत करण्याचे आदेश न्यायालयाकडून पालम पोलिसांना प्राप्त झाले होते सोमवारी उपविभागीय पोलिस कार्यालय पुर्णा येथे वार्षीक तपासणी करीता आलेले नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते जप्त केलेला ऐवज मूळ मालकांना परत करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, प्रभारी पोलिस उपअधीक्षक सुभाष राठोड आदींची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या