💥परभणी जिल्ह्यात आज गुरुवारी आढळले ४१ कोरोना बाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज गुरुवारी उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू💥 

परभणी (दि.२५ फेब्रुवारी) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज गुरुवार दि.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत ४१  कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या २५ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात २६४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३२३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ४१५ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ८२८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख  २२ हजार ९०६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख १३ हजार ९३५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार २५९ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५७२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या