💥परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर माझी वसुंधऱा अभियानाच्या निमित्ताने सायकलवरून आले कार्यालयात....!

💥राज्यशासनाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता 'माझी वसुंधरा अभियान' राबवले आहे💥

परभणी (दि.९ फेब्रुवारी) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आज मंगळवार दि.९ फेब्रुवारी रोजी माझी वसुंधऱा अभियानाच्या निमित्तानं सायकलवर प्रवास करीत जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावण्यासाठी उपस्थित राहिले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रत्येक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयसह अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यापुढे सायकलवरून प्रवास करीत कार्यालयात येणार आहेत.राज्यशासनाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता 'माझी वसुंधरा अभियान' राबवले आहे.


राज्यतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचार्‍यांनी शासकीय कार्यालयात ये-जा करण्यासाठी वाहनाऐवजी पायी, सायकल वा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत खासगी वाहनाचा वापर कटाक्षाने टाळावा. जेणे करून वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. व हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा व्हावी, हाच या मागचा उद्देश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामुळेच आता यापुढे दर मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांसह अन्य अधिकारी - कर्मचारी वाहनांऐवजी सायकलने कार्यालयात दाखल होणार आहेत...

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व अधिकारी - कर्मचार्‍यांनी माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवून परभणी जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत अग्रभागी ठेवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या