💥गोष्ट आहे सिंधी बांधवांची पण यातून बोध घ्यावा प्रत्येक समाज बांधवांनी....!


💥बोधकथा प्रत्येक समाजाने या बोधकथेतून शिकायलाच हवे💥

६-७ महिन्यापुर्वीची गोष्ट आहे.

मी एका माझ्या सिंधी मित्राबरोबर त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेलो होतो.

भारतीय बैठक होती. आमच्या बरोबर आणि काही सिंधी समाज बांधव तिथे बसले होते.चहा नाष्टा झाला आणि सिंधी भाषेत त्यांचा वार्तालाप सुरू झाला.

माझ्या डोक्यावरुनच सगळे जात होते. शांततेत असलेलं बोलणे जरा चढ्या आवाजात सुरू झाले. ज्या व्यक्तीच्या घरी गेलो होते त्याची पत्नी, त्याचा २२-२३ वर्षाचा मुलगा आणि १९-२० ची मुलगी समोर बसले होते. त्यांचे चेहरे रडवेले झाले होते.

मला वाटले सांत्वन बैठक असेल.

अंदाजे 40 मिनीटानंतर आम्ही उठलो.

पण उठताना माझ्या त्या सिंधी मित्रांनी एक नोटांचे बंडल तिथल्या तक्याखाली हळुच ठेवले.

मी ते पाहीले होते. लिफ्टमधुन खाली उतरत असताना मी विचारले, काय भानगड काय होती..?

*तसे तो मित्र सांगु लागला....*

अरे परांजपे, आम्ही सिंध प्रांतातुन इथे आलो, येतेवेळी आमच्याकडे काहीही नव्हते.समाजानी मिळेल ते व्यवसाय,धंदा केला पण नोकरी नाही केली.तुम्ही लोक शिकलेले, बँकेत लोन घेता.

*पण आमच्यात तसे नाही...*

ज्या माणसाच्या घरी गेलो होतो त्याची धंद्यात थोडी चुक झाली, आणि त्याला ३० लाखाचा घाटा झाला.

मग आमची *सिंधी समाज* बैठक घेतली आणि त्याला त्याचं धंद्यात परत उभे करुन वर काढायचे ठरवले.

मी विचारले, तु किती रक्कम तक्याखाली ठेवलीस..?

तो म्हणाला, अरे तिथे आलेल्या प्रत्येकानी ५ ते ६ लाख तिथे ठेवले. तो यातुन नवीन व्यवसाय सुरू करु शकतो आणि परत कोणी सिंधी अडचणीत आला तर त्याला बिंधास्त मदत तो करणार हे नक्की.... 

*मी आवाक होवुन ऐकत होतो..*

*सिंधी समाज हा ह्या देशात फाळणीमुळे पाकीस्तानमधुन निघून आलेला अल्पसंख्यांक समाज.*

आले तेव्हा निर्वासीत म्हणुन त्यांची ओळख. क्वचीतचं सिंधी नोकरी करताना दिसतो. हे हर एक व्यवसायात आहेत, निर्वासीत म्हणवुन घेणारे आज नगरे बसवत आहेत. 

*खरचं समाजाची एकजुट ईथे दिसते.यांना कोणतेही आरक्षण नाही आणि ते मागतही नाहीत..!*

.*आपला मराठी माणुस असा कधी वागेल का..? कधी आपण सुधारणार..?* 

*का नुसते एकामेकांची उणी-धुणीचं काढत बसणार..?*

*अगोदरच जाती-पाती मध्ये विभागलेला मराठी माणुस आता संघटना,पक्ष, अजूनचं खालावत चालला आहे.*

*धन्य ते सिंधी बांधव....🙏🏽*

*धन्य त्यांचे विचार.......🙏🏽*

*एक चांगला विचार*.... 

बघा जमलं तर विचार करुन.🙏🏽

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या