💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात अवैध सावकारी करणाराच्या घरासह दुकानावर उपनिबंधकांच्या पथकाची धाड...!


💥गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली💥

परभणी (दि.४ फेब्रुवारी) जिल्ह्यात अवैध सावकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून बेकायदेशीररित्या मजबूर लोकांना अव्वाच्या सव्वा टक्के दरांनी व्याजाने पैश्याच्या पुरवठा करीत त्यांच्या शेत संपत्तीवर कब्जे करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास येत असून अश्या हरामखोर सावकारांना राजकीय वरदहस्त प्राप्त होत असल्याने राजकीय पक्ष पदांची ढाल बनवून स्वतःसह स्वतःच्या काळ्या कारभाराला सुरक्षित करण्याचा सोपा मार्ग अवलंबणारे असे हरामखोर शेठ सावकार आता विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्यासह व्याजाने पैसे घेतलेल्या मजबूर शेतकरी,शेतमजूर,किरकोळ व्यापारी तसेच शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसत असून अश्याच प्रकारे जिंतूर शहरात अवैध सावकारी करणार्‍याच्या घरावर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत गहाणवस्तू ज्यात सोने, चांदीसह धनादेश, नोंदवह्या आढळल्याने संबंधिताविरूध्द अवैध सावकारी करीत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

जिंतूर येथील रमेश माणिकराव शहाणे हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांना मिऴाली होती. या तक्रारीची जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सावकारांचे उपनिबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी अर्जावर प्राथमिक चौकशी केली. सावकारी व्यवसाय करीत आहे किंवा नाही याबाबत शहानिशा करून प्राप्त झआलेल्या अहवालानुसार सावकाराच्या राहत्या घरासह व्यवसायाच्या ठिकाणाची झडती घेण्यासाठी पथकांची नियुक्ती केली.

या पथकात कार्यालय अधीक्षक एस.व्ही. अब्दागीरे, बी.एस. नांदापूरकर, वरिष्ठ भाऊराव कुरूडे यांच्यासह डी.एस. हराळ, श्रीमती ए.जी. निकम, प्रशांत बाहेकर, नारायण वाशवेणो, सचिन लोणीकर, एस.एम. कनसटवाड यांच्या पथकाने गुरुवारी रमेश शहाणे यांच्या जिंतूर येथील राहत्या घरासह दुनाकाची झडती घेतली. त्यावेळी गहाण वस्तू म्हणून ठेवलेल्या सोने- चांदी आढळली. त्याचबरोबर धनादेश व नोंदवह्याही पथकास तेथे आढळल्या. 

दरम्यान, रमेश शहाणे यांच्यावरिूध्द अवैध सावकारी करीत असल्याबाबत गुन्हा नोंद करण्याबाबत जिंतूर येथील सहाय्यक निबंधक असाराम गुसिंगे यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती उपनिबंधक श्री. सुरवसे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या