💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीच्या उद्रेकाला सुरूवात; आज बुधवारी आढळले ५५ कोरोनाबाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ३२२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू💥 

परभणी (दि.२४ फेब्रुवारी) - परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारी हळुवारपणे पाय फैलावतांना दिसत असून जिल्ह्यात कोरोना महामारीच्या उद्रेकाला सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात नागरिकांकडून प्रशासकीय निर्देशांची पायमल्ली होत असल्यामुळे जिल्ह्यात आज बुधवार दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत तब्बल ५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरल्याचे दिसत असून जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारा नंतर बरे झालेल्या १० कोरोनामुक्त व्यक्तींना आज बुधवारी रुग्णालय प्रशासनाकडून  डिस्चार्ज देण्यात आला तर जिल्ह्यात आज एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात २४९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.त जिल्ह्यात आजपर्यंत ३२२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ३७४ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ८०३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख २१ हजार ९२६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख १२ हजार ९९९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार २१८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५६९ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या