💥महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा पूजा चव्हाण प्रकरणी अखेर राजीनामा....!


💥पूजा चव्हाण प्रकरण राठोड यांना चांगलेच भोवले असून मंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला💥

मुंबई (दि.२८ फेब्रुवारी) -  वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडल्या. वेगवेगळ्या मार्गांनी पूजा चव्हाण आत्महत्येचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

          मागच्या वीस दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव येत असल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राठोड हे राजीनामा देतील की नाही याबाबत अनेक तर्क लावल्या जात होते. मात्र पूजा चव्हाण प्रकरण राठोड यांना चांगलेच भोवले असून मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

             दरम्यान पूजा चव्हाण च्या कुटुंबीयांनी थेट कुणाचे नाव अद्याप घेतलेले नाही. मात्र भाजपच्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरत अवघ्या महाराष्ट्रात रान पेटवले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या