💥बुद्ध धम्म दर्शन सहल भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रवाना......!


💥तीन सुसज्ज लक्झरी बसेस मधून श्रद्धा संपन्न उपासक-उपासिका रवाना💥

पूर्णा (दि.१७ फेब्रुवारी) येथील भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या सदोतीस वर्षापासून धम्म सहलीचे आयोजन देश व विदेशात केले जाते.

भारत देशातील प्रमुख बौद्ध धम्म स्थळे बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, नालंदा, सांची, नागपूर, दिल्ली, लखनऊ या व इतर बौद्ध स्थळाला तीन सुसज्ज लक्झरी बसेस मधून श्रद्धा संपन्न उपासक-उपासिका रवाना झाले आहेत.

याप्रसंगी बुद्ध विहारांमध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी पूर्ण शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिला मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या