💥ताडकळस येथे दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी...!


💥कार्यमास प्रमुख उपस्थिती ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि विजय रामोड यांची होती💥

ताडकळस (दि.२१ फेब्रुवारी) - आद्य पत्रकार,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्याने आज २० फेब्रुवारी २०२१ रोजी बाळशास्त्री जांभेकरांची २०९ वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करावयाचे ठरवले आहे . उशिरा का होईना सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत .

त्यावरून मराठी पत्रकार परिषद देखील आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी राज्यभर बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्यात आली

त्याअनुशंगाने ताडकळस येथील मराठी पत्रकार संघ ,मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न च्या वतीने ताडकळस येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांची २०९ वी जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ताडकळस पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष मदनराव आंबोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ताडकळस नगरीचे प्रथम नागरिक सरपंच गजानन आंबोरे हे होते तर कार्यमास प्रमुख उपस्थिती ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि विजय रामोड यांची होती यावेळी पोकाँ.बालाजी शेंबेवाड ,होमगार्ड भगवान तनपुरे ,ग्रामपंचायत सदस्य बबलु माने ,रिपब्लिकन सेनेचे लिंबाजी गायकवाड यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते .

सर्व प्रथम दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ताडकळस पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,सचिव दिपक कानडे ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,कार्याध्यक्ष मदनराव आंबोरे ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धम्मपाल हानवते ,गजानन नाईकवाडे ,शेख शहजाद ,नजीर पठाण ,हनुमान खुळखुळे ,सचिन सोनकांबळे ,शमिम पठाण आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती .

यावेळी बोलताना ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि विजय रामोड म्हणाले की सध्यास्थितीला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासनाच्या वतीने जे नियम घालून देण्यात आले आहेत त्या नियमांचे पालन ताडकळस व परिसरातील प्रत्येक नागरिकाने आपआपल्या निरोगी व सुंदर जीवनासाठी काटेकोरपणे करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले व ग्रामपंचायत व पत्रकार बांधवांनी देखील आपआपल्या परीने मोठ्या प्रमाणात कोरोना विषयावर जनजागृती करावी जनजागृतीत मुख्यतः ताडकळस व परिसरातील व्यापारी यांनी आपआपल्या दुकानात सॅनॅटायझरचा योग्य वापर करावा ,वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ धुने ,ग्राहकाला व स्वतःला मास्क चा वापर अनिवार्य करने सह आदी सुचना त्यांनी यावेळी सुचवल्या व ताडकळस पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या तद्नंतर ताडकळस नगरीचे सरपंच गजानन आंबोरे यांनी देखील कोरोना महामारी विषयी ताडकळस येथील प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर योग्य ती खबरदारी घ्यावयाची आहे . व या मोठ्या प्रमाणात वाढणारया कोरोनावर ताडकळस ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य ती उपाययोजना करून जनजागृती करणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले व ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणी झाल्याबद्दल ताडकळस पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,सचिव दिपक कानडे यांच्यासह पदाधिकारी ,सदस्य व नुतन कार्यकारणीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान खुळखुळे यांनी तर आभारप्रर्दशन धम्मपाल हानवते यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या