💥परभणी जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळले ३३ कोरोनाबाधित रुग्ण तर उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू...!


💥जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात २३७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत💥

परभणी (दि.२६ फेब्रुवारी) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी०७-०० वाजेपर्यंत ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ५९ कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. तर जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात २३७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आजपर्यंत ३२४ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ४४८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ८८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख २४ हजार २२ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख १५ हजार १८ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार २९२ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५७२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या