💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी आढळले ३१ कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.२० फेब्रुवारी) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज शनिवार दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत तब्बल ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ३१ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आज उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात १७८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत ३२० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार २४७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ७४९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २० हजार १४५ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ११ हजार ४०५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ४८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५५२ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या