💥नांदेड गुरूद्वारा चौक परिसरात 'अकाल इंन्टरप्राईजेस'चा उदघाटन सोहळा संत बाबा बलवींदसिंघजी यांच्या हस्ते संपन्न...!

 


💥उदघाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून गुरूद्वारा बोर्डाचे सेक्रेटरी सरदार रविंदरसिंघ बुंगई यांची उपस्थिती💥 


नांदेड : येथील राष्ट्रवादी काँग्रेस सिख आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा समाजसेवक सरदार जरनैलसिंघ भुजंगसिंघ गाडीवाले यांच्या 'अकाल इंन्टरप्राईजेस' इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स या होलसेल व रिटेल व्यवसायीक प्रतिष्ठाणचे उदघाटन काल शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास महान संत तथा नांदेड भुषण संत बाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांच्या शुभ हस्ते गुरूद्वारा चौक परिसरात संपन्न झाले.या भव्य उदघाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून हुजूर साहिब नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे सेक्रेटरी सरदार रविंदरसिंघजी बुंगई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी शाल शिरोपाव देऊन सरदार जरनैलसिंघ गाडीवाले यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन आशिर्वाद दिला या कार्यक्रमास सिख समाजातील विविध सन्माननीय व्यक्तींसह सर्मधर्मिय मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या