💥परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी १५४ उमेदवारी अर्ज दाखल....!


💥अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली💥

परभणी (दि.२२ फेब्रुवारी) - परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांच्या जांगाकरिता सोमवारी अंतिम मुदतीपर्यंत एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष संस्था मतदारसंघात १४ जागांकरिता ८९ अर्ज दाखल झाले आहेत. कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघात एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. इतर शेती संस्था मतदारसंघात एका जागेसाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव मतदारसंघात दोन जागांकरिता १५ अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघात एका जागेकरिता दहा अर्ज, इतर मागासप्रवर्ग मतदारसंघात एका जागेकरिता सात अर्ज, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष प्रवर्ग मतदारसंघात एका जागेसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असे श्री सुरवसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले.

दरम्यान, या उमेदवारी अर्जांची छाणनीची प्रक्रिया उद्या मंगळवार दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार असल्याचीही माहिती श्री.सुरवसे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या