💥परभणी जिल्ह्यात आढळले आज सोमवारी ४ कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ४३ रुग्ण उपचार घेत आहेत💥 

परभणी (दि.१ फेब्रुवारी) - शहरासह जिल्ह्यात आज सोमवार दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ८ कोरोनामुक्त व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ४३ रुग्ण उपचार घेत आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ३१४ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ९६१ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ७ हजार ६०४ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख १३ हजार ७३१ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ५ हजार ३१९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर सात हजार 762 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५१२ अनिर्णायक व १३८ नमुने नाकारल्या गेले असल्याचेही प्रेसनोटव्दारे सांगण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या