💥पुर्णा येथील रेल्वे कर्मचारी के.एच.बगाटे सेवा निवृत्त....!


💥रेल्वे प्रशासनात ३७ वर्षे अत्यंत उत्कृष्टपणे सेवा बजावत सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा करण्यात आला सत्कार💥

पूर्णा (दि.१ फेब्रुवारी) - येथील रेल्वे स्टेशनचे कार्यालयीन अधिक्षक कैलाश हरिभाऊ बगाटे हे रेल्वे प्रशासनात तब्बल ३७ वर्ष सेवा करून सेवा निवृत्त झाले.सुरवातीस रेल्वे सुरक्षा दलात भर्ती झालेले के.एच.बगाटे यांनी नंतर कार्यालयीन कारकून ते अधिक्षक पदापर्यंत पोचले त्यांना उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल ४ वेळा महाप्रबंधक यांच्याकडून तर ५ वेळा विभागीय प्रबंधकांकडून पारोतोषीक मिळाले आहे त्यांनी सिकंदराबाद,हुबळी,नांदेड,पुर्णा येथे सेवा बजावली आहे.  


रेल्वे प्रशासनात ३७ वर्षे अत्यंत उत्कृष्टपणे सेवा बजावत सेवानिवृत्त  झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भंन्ते बोधिधम्मा ,रेल्वे अधिकारी शे अहेमद,यादव,नगरसेवक उत्तम खंदारे,जेष्ठ रिपाई नेते प्रकाश कांबळे,रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे, शामराव गायकवाड, सिद्धीर्थ भालेराव,इंजि अविनाश बगाटे, इंजि अतुल बगाटे, सेवा निवृत्त सेनिक वसंत देबाजे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या