💥परभणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या मार्फत व्यापारी महासंघाचे जिएसटी विरोधात पंतप्रधानांना चार पानी निवेदन...!


💥निवेदनात जिएसटी मधील वेगवेगळ्या अशा तरतुदींवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे💥

परभणी (दि.२६ फेब्रुवारी ) - जीएसटी करातील अन्यायकारक तरतुदींचा जिल्हा व्यापारी महासंघाने आज शुक्रवारी दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पानी पाठवलेल्या निवेदनाव्दारे तिव्र निषेध नोंदवला आहे.

परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिव सचिन अंबिलवादे, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, उपाध्यक्ष रमेश पेकम, अफजल पाडेला, सहसचिव संदीप भंडारी, अशोक माटरा, रामुसेठ माहेश्वरी,नंदकिशोर अग्रवाल, सुनील खैराजानी, प्रवक्ते ओमप्रकाश डागा,अशोक डहाळे, धनराज जैन, अशोक चोपडे, प्रवीण बोंडे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी बंदच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन सादर केले. त्या निवेदनात वेगवेगळ्या अशा तरतुदींवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या