💥भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार जाहिर....!


💥पंतप्रधान मोदी यांना ‘सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे💥

पुढील आठवड्यातील एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पंतप्रधान मोदी हे ‘सेरावीक परिषद २०२१’ मध्ये बीजभाषण करणार असून १ ते ५ दरम्यान ही परिषद ऑनलाइन घेण्यात येणार आहे,असे आय.एच.एस. मर्किट या संस्थेने म्हटले आहे परिषदेत अमेरिकेचे ऊर्जा दूत जॉन केरी, बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स, अरम्को या सौदी अरेबियातील ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासेर सहभागी होणार आहेत. 

आय.एच.एस. मार्किटचे उपाध्यक्ष व परिषदेचे अध्यक्ष डॅनियल येरगिन यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत.भारत हा जगातील मोठा लोकशाही देश असून सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आम्हाला आनंदच आहे.शाश्वत विकास व ऊर्जेच्या गरजा यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. 

आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन व नवीन ऊर्जा भवितव्य यात भारताने जागतिक पातळीवर काम केले असून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रातही चांगली भूमिका पार पाडली आहे.उद्योग धुरीण, देशांचे नेते,धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत.जगाला नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाची गरज असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्राने पुढे येण्याची गरज आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या